देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
दि.२५ जुलै रोजी ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री ना.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा पारधी वाडी तालुक्यातील अंढेरा येथे गरजु शालेय विद्यार्थ्यांना माननीय सतीश भाऊ नागरे भाजपा कार्यकर्ते यांच्यावतीने वर्ग एक ते पाच एकूण ३८ विद्यार्थ्यांना स्कूल बॅग पेन प्रत्येकी पाच नोटबुक्स वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी औरंगाबाद येथील संजू सुराणा, हेमंत खेडकर, डॉ. गणेश मांटे, एकनाथ काकड, सरपंच संतोष नागरे, मुख्याध्यापक मदन नागरे, सहायक अध्यापक समाधान वाघ, केंद्रप्रमुख सुनील मुळे, उर्दू शाळेचे मुकीम जनाब, शाळा समिती अध्यक्ष भोसले, जगन डोईफोडे, प्रकाश कापसे, पत्रकार ज्ञानू मस्के, राधाकिसन ढाकणे, बबनराव भोसले, विठ्ठल पवार, सचिन भोसले, माजी जि प सदस्य भीमराव पालवे, पंचायत समिती सदस्य प्रमोद सानप, मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. माननीय सतीश भाऊ नागरे यांच्या उपक्रमामुळे खरोखर वंचित विद्यार्थ्यांना लाभ मिळाला त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


No comments:
Post a Comment