विविध कार्यक्रमाने वाढदिवस साजरा
देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
महाराष्ट्राच्या राजकिय कुरूक्षेत्रावर अलीकडच्या काळात ज्या महिला नेतृत्वाचं नाव चांदा ते बांद्यापर्यंत जावुन पोहोचलं त्या राज्याच्या ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री तथा लोकनेत्या ना.पंकजाताई गोपीनाथ मुंडे होय हे नेतृत्व म्हणजे सर्वसामान्य माणसाला आपलसं वाटणारा नेतृत्व असल्यास मत भाजपचे युवा नेते डॉ सुनील कांयदे यांनी व्यक्त केले. त्यांच्या वतीने ठिकठिकाणी वुरक्षरोपण व शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रम बोलत होते यावेळी सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर, नगराध्यक्षा डॉ सुनीता शिंदें, बांधकाम सभापती शारदा जायभाये, महिला आघाडी च्या जिल्हा उपाध्यक्ष डॉ शिल्पा कांयदे आदी मंडळी उपस्थित होते.
यावेळी डॉ सुनिल कांयदे बोलताना म्हणाले की, अल्पावधीच्या काळात स्वकर्तृत्वाने सर्वसामान्य जनतेच्या ह्दयात ज्यांनी जागा मिळवली माय-बाप जनतेचं प्रेम आणि आशिर्वाद मिळवण्यात ज्यांना यश आलं ते नेतृत्व म्हणजे पंकजा ताई मुंडे .मात्र आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत असं एक नेतृत्व राज्याच्या राजकारणात इतिहास घडवणारं आहे. स्वकर्तृत्वाचा नवा विक्रम प्रस्थापित करताना विकासाची महाचळवळ आणि स्वच्छ राजकारणाची संस्कृती निर्माण राज्य प्रगतीपथावर घेवुन जाण्यात आलेलं त्यांना यश याचि देहि, याचि डोळा दिसत आहे. अशक्य गोष्टी शक्य करणारी महिला महाराष्ट्राची वाघीण म्हणुन पुढे आली. त्यांच्यातली राजकिय शुरवीरता आणि चाणक्य नितीचा स्वभाव हा अगदी विरोधकांनाही गिळंकृत करण्यासारखाच आहे. संघर्ष हा पाचवीला पुजलेला.मात्र राजकारणात संघर्षाच्या पायºया चढत जिंकलेली लढाई खºया अथार्ने नेतृत्वाच्या सीमा पार करणारी ठरली आहे. संघर्षशालिनी, महाराष्ट्राची वाघिणी ही याचा स्वाभिमान लोकांना वाटतो. अध्यात्म आणि विज्ञान दोन्ही बाजु सोबत घेवुन वंचित, उपेक्षित, दीनदलित, कष्टकरी, मजुर, शेतकरी, ऊसतोड कामगार यांच्यासाठी जीवापाड परिश्रम घेत ग्रामीण भागाचा उद्धार त्यांनी करून दाखविला.विकासाची ओळख करून देणारा नेतृत्व असं म्हटलं तर चुक ठरणार नाही.राजकारणाच्या क्षितीजावर त्यांचे पुढे पडत असलेले पाऊल मॉं जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांनी घालुन दिलेल्या आदर्शव्रत त्यागाचं सुचिन्ह नक्की दिसत असल्याचं ही डॉ सुनील कांयदे यांनी सांगितले. याप्रसंगी शिवसेना भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment