Wednesday, July 31, 2019

शहिदांचे बलिदान कदापि व्यर्थ जाणार नाही : आ. डॉ. खेडेकर

 
 देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
      अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत भारतीय जवानांनी २० वर्षांपूर्वी त्यांच्या शौयार्तून आणि बलिदानातून देशाचे रक्षण केले. प्रसंगी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या शौर्य आणि बलिदानाचे स्मरण म्हणून देशभरात कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. कारगिल युद्धातील शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे प्रतिपादन आ.डॉ. शशिकांत खेडेकर यांनी येथे केले.
        देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी तहसीलदार सुनील सावंत, पोलीस निरीक्षक संभाजी पाटील, माजी सैनिक चाटे, मातृतीर्थ पत्रकार संघाच्या अध्यक्षा सुषमा राऊत, पत्रकार मुशीर खान कोटकर आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार खेडेकर यांनी शहिदांना पुष्प अर्पण केले. यावेळी कारगिल वीरांच्या शौयार्चे, पराक्रमाचे स्मरण करण्यात आले. कारगिल युद्धानंतर आता कोणतेही शत्रूराष्ट्र वा संघटना भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो हल्ला कदापिही सहन करणार नाही. तो हल्ला परतवून लावेल, असा विश्वास आ. खेडेकरांनी व्यक्त केला. तर कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभागी असलेले पोलीस नाईक सुनील सुरडकर यांनी आपले मनोगत केले. सूत्रसंचालन सूरज गुप्ता यांनी केले. 

 




 

 
     

No comments:

Post a Comment