Wednesday, July 31, 2019

आझाद ब्रिगेड च्या वतीने भारतरत्न अब्दुल कलाम यांना अभिवादन


 देऊळगाव मही : (गजानन चोपडे)
        देऊळगाव मही येथे भारतरत्न मा.राष्ट्रपती ए.पी. जे.अब्दुल कलाम यांना दि.२७ जुलै रोजी अभिवादन करण्यात आले.
संकुचित ध्येय बाळगू नका. महान विचारदृष्टी समोर ठेऊन परिश्रम केले तर आपला देश निश्चितपणे एक विकसित राष्ट्र बनेल असे देशप्रेमी समतावादी विचार मांडणारे महापुरुष कलाम होते.
      आपल्या बुद्धीच्या जोरावर देशाला क्षेपणास्त्र देऊन कलामांनी देशाला ताकतीने श्रीमंत केले. विज्ञानवादी, समतावादी ,देशाशी निस्वार्थ प्रेम करणारे कर्ते महापुरुष, म्हणुन भारत रत्न राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी स्वत: ची वर्क वेगळी ओळख निर्माण केली. अश्या महान मानवाच्या यांच्या पुण्यतिथी निमित्त आझाद ब्रिगेड च्या वतीने देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात आवारात वृक्षारोपण करण्यात आले. या निमीत्त समाधान शिंगणे(युवा परिवर्तन फाऊंडेशन अध्यक्ष),आदील पठाण(आझाद ब्रिगेड अध्यक्ष),शेख कलिम (आझाद ब्रिगेड विश्वास्त), डॉ.सोळुंके, धर्मराज खिल्लारे (व्ही. बी.ए), शेख शकील (आझाद ब्रिगेड ता.अध्यक्ष), इरफान शेख पत्रकार, शेख अमान, शेख राजू, शेख सोहिल, यांच्या सह युवा मंडळी उपस्तीत होते.





 
     

No comments:

Post a Comment