महिला आरोपीवर विश्वास ठेवणे महिलांना भोवले
देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
हॉस्पिटलमध्ये रुग्णाला सोबत असलेल्या महिलांना विश्वासात घेऊन नकली सोन्याच्या गिणण्या देऊन तीन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली दरम्यान त्यांच्याकडून नकली सोन्याच्या गिणण्या जप्त करण्यात आल्या असून न्यायालयाने एका आरोपीस दि.३आॅगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार शहरातील संजय नगर येथे राहणारी शिलाबाई बबन तिडके पुणे येथील रुबी हॉस्पिटल मध्ये होती सदर हॉस्पिटलमध्ये तिची ओळख कॅन्सर पेशंट सोबत आलेल्या रोहिणी ज्ञानदेव कांबळे या महिलेशी झाली थोड्याच दिवसात दोघांची मैत्री झाली काही दिवसानंतर माज्या दाजी च्या शेतात सोन्याच्या गिन्न्या सापडल्या आहे मी तुम्हाला वीस हजार रुपये तोळ्याने घेऊन देते असे सांगून शिलाबाई ने विश्वास संपादन केला व दोन सोन्याच्या गिन्न्या तपासण्यासाठी दिल्या पुणे येथे सोनाराकडून सदर गिन्न्या तपासले असता त्या गिरण्या सोन्याच्या निघाल्या आपण सदर वीस तोळे सोने घेऊन विकल्यास कॅन्सरने ग्रस्त असलेल्या आपल्या रुग्णाचा खर्च निघतो या आशेने त्यांनी सोने खरेदी करण्याचे ठरविले दरम्यान रोहिणी यांनी स्वत:चे दागिने मोडले नातेवाइकांकडून उसने घेऊन पैशांची जुळवाजुळव केली आणि आणि तीन लाख रुपये घेऊन दि.२० जून रोजी देऊळगाव राजा गाठले संजय नगर येथे राहत असलेल्या शिलाबाई च्या घरी रोहिणी कांबळे व त्यांची बहीण कलावती गायकवाड या दोघीही पोचल्या यावेळी शिलाबाई ने तथाकथित दाजी देविदास दयाराम पवार या घेऊन बोलावले त्याच्या कडे २० तोळे सोन्याच्या गिरण्या होत्या मात्र रोहिणी यांच्याकडे वीस हजार रुपये प्रमाणे पंधरा तोळ्याचे चे तीन लाख रुपये होते यावेळी देविदास मे २० तोळे सोने त्यांना देऊन तीन लाख रुपये घेतले व पाच तोळे सोने शिलाबाई यांचा कमिशन म्हणून देण्याचे ठरले तदनंतर शिलाबाई ने आपल्या मैत्रिणी रोहिणी कलावती यांना सिंदखेड राजा येथे जिजाऊंचा राजवाडा फिरवून शेगाव येथे गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी नेले तेथे एका हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम केला व दुस?्या दिवशी देऊळगाव राजा येथे परत आले सोन्याच्या गिन्न्या घेऊन दोघी बहिणी पुण्याला जाण्यासाठी निघाल्या त्यांच्यासोबत पाच तोळ्याचा कमिशन घेण्यासाठी शिलाबाई सुद्धा बस मध्ये बसली बसमध्ये थोड्याच वेळानंतर शिलाबाईना त्यांच्या मोबाईलवर कॉल आला व मावशी मृत पावली असल्याचे समजले व ती जालना येथे उतरले रोहिणी व कलावतीबाई बस प्रवासात असताना त्यांना एका महिलेचा फोन आला व तुम्ही ही विकत घेतलेल्या सोन्याच्या गिन्न्या नकली आहे सोनाराकडे नेऊ नका व पोलीसतही जाऊ नका असे बोलून सदर कॉल कट झाला घरी पोहोचल्यानंतर त्यांनी शिलाबाई ला कॉल केला असता तिचा मोबाईल नंबर बंद आला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी देऊळगाव राजा येथील संजय नगर स्थित शिलाबाई चे घर गाठले तर तिच्या घराला कुलूप होते तदनंतर रोहिणी ज्ञानदेव कांबळे यांनी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली थोड्यावेळाने शिलाबाई पोलीस ठाण्यात प्रकट झाली तिने फियार्दी यांच्याकडे चाळीस हजार रुपये जमा केले व उर्वरित रक्कम देविदास कडून परत घेण्यासाठी दि.३० जुलै प्रयन्त ची मदत मागितली यावेळी फियार्दी रोहिणी कांबळे यांनी पोलिसांना परत अर्ज देऊन तीस तारखेपर्यंत गुन्हा नोंदवू नका अशी विनंती केली ३० तारीख उलटल्यानंतरही उर्वरित दोन लाख साठ हजार रुपये मिळाले नसल्याने फसवणूक झाल्याप्रकरणी पोलिसांनी रात्री गुन्हा नोंदवून देविदास दयाराम पवार व शिलाबाई बबन तिडके यांना अटक केली यापैकी देविदास यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली सदर प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक श्री भुजबळ उपविभागीय पोलिस अधिकारी भीमआनंद नलावडे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संभाजी पाटील उपनिरीक्षक बसवराज तमशेट्टे टाऊन जमादार जगदीश वाघ तपास करीत आहे.


No comments:
Post a Comment