देऊळगावराजा नाभिक संघटनेचा अनोखा उपक्रम
देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
कर्करोगाचे रुग्णांमध्ये जगात भारताचा तिसरा क्रमांक लागतो. अनेक रुग्णांना कर्करोगाचे उपचार घेण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होत नाही. अशा रुग्णांना मदत करण्यासाठी अनेक संघटना काम करीत आहे. परंतु श्री बालाजी महाराजांच्या पुण्यनगरीतील नाभिक संघटनेच्या वतीने एका कँन्सरग्रस्त महिलेला आर्थिक मदत करुन सामाजिक बांधलकीचे दर्शन घडविले आहे.
कर्करोगाच्या रुग्णांना रोगाचे निदान करण्यासाठी सुरुवातीला किमान १४ हजार रुपयांच्या तपासण्या कराव्या लागतात. या तपासण्यांसाठी येणारा खर्च पाहूनच अनेक जण या रोगाच्या उपचारासाठीच नाजूक परिस्थिती मुळे जात नाहीत. शहरातील सौ.द्वारकाबाई अभिमन्यू मोहिते यांना अन्ननलिकेचा कॅन्सर झालेला आहे. त्यात महिला अत्यंत गरीब आणि घराची आर्थिक परिस्थती नाजुक असल्याने पुढील खर्च कसा करणार या विचारात जिवन जगत होते. परंतु शहरातील नाभिक संघटना नेहमी गरजु लोकांसाठी मदतीचा हात देत त्यांना साळ देत आहे. या गरीब महिलेस वेळेवर उपचार मिळावे याकरीता देऊळगावराजा नाभिक संघटनेने सामाजिक बांधलिकी जोपासत आर्थिक मदत देण्याचे ठरविले. त्या महिलेला वैद्यकीय उपचारासाठी १५ हजार ६७० रुपये जमा करुन ही रोख रक्कम त्या महिलेच्या पती आणि सासूला देण्यात आली. देऊळगावराजा नाभिक संघटनेच्या वतीने अनेक वेळा गरजु आणि गरीबाची केली आहे. आणि भविश्यात असे उपक्रम राबवून आदर्श निर्माण करणार आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे नाभिक संघटनेचे सर्वत्र कौतूक होत आहे.
नाभिक संघटनेच्या वतीने मदतीचा हात
देऊळगावराजा नाभिक संघटनेच्या वतीने गरीब व गरजुना नेहमी मदतीचा हात देणार असा संकल्प देऊळगावरजा नाभिक संघटनेने घेतलेला आहे. या पुढेही या रोगासाठी व गरजुना अशीच मदत करण्यात येणार अशी प्रतिक्रीया नाभिक संघटनेचे सुनिल शेजूळकर साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेस प्रतिनिधीशी बोलतांना दिली.



No comments:
Post a Comment