Wednesday, August 7, 2019

देऊळगाव मही परिसरात बनावट नोटा चलनात



 देऊळगावराजा : (प्रतिनिधी) 
       परिसरात पन्नास व शंभर रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्या जात असल्याने परिसरातील नागरिक व व्यावसायीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशीच नकली नोटा चलण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
         राष्ट्रीयीकृत बँका व पतसंस्थाच्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते. देऊळगाव मही अर्बन पतसंस्थेने विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमधून व्यवहारासाठी दि.५ आॅगस्ट रोजी रक्कम आणली होती. सदर नोटांची तपासणी केली असता पन्नास रुपयांची संशयित नकली नोट आढळून आली आहे. ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर शासनाने २ हजार व ५०० च्या नव्या नोटा चलनात आणल्या. नवीन २ हजार व ५०० च्याही नोटा चलनातून बाद होण्याची अनामिक भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे शंभर, पन्नास, वीस व दहा रुपयांच्या नोटांना नागरिक साठवून ठेवत असल्याचे दिसून येत आहे. याचा फायदा घेत पन्नास व शंभर रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्या जात आहेत. गर्दीच्या ठिकाणी अशा नोटा व्यावसायिकांना दिल्या जात असल्याची नागरिकांत चर्चा आहे. घाई असल्याने नागरिक लगबगीने या नोटा आपल्या पाकिटात टाकतात. त्या बनावट आहेत की नाही याची शहानिशा केली जात नाही. त्यामुळे नागरिकांची फसगत होत आहे. अनेकांना अशा बनावट नोटा मिळाल्या आहेत. मात्र तक्रार केल्यास पोलिसी ससेमिरा मागे लागेल, या भीतीने कुणीही अद्याप पोलिसांत तक्रार करण्यास धजावला नाही.
          यापूर्वीही मिळाल्या होत्या संशयित नोटा
      शंभरच्या व पन्नासच्या नोटा गअदी सुक्ष्मपणे व बारकाईने बघितल्यास या नोटा स्कॅनरच्या उपयोग करून तयार करण्यात आल्या असाव्या असे जाणवते. आजही सिरिजमध्ये संशयित नोट अढळून आली आहे. यामुळे नकली नोटा चलनात आणणारी टोळी या भागात सक्रिय झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नोटा घेताना शहनिशा करणे गरजेचे असल्याचे देऊळगावमही अर्बनचे शिवाजी टाले यांनी सांगितले.
 
 




 

 
     

No comments:

Post a Comment