Friday, August 9, 2019

कोल्हापूर दुर्घटनेमुळे शिवस्वराज्य यात्रा रद्द


  

 सिंदखेड राजा : (प्रतिनिधी) 
       कोल्हापूर येथील दुर्घटनेत १९ जण मृत्युमुखी पडल्याने दि.१० आॅगस्ट रोजी सिंदखेड राजा येत असलेली शिवस्वराज्य यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष. अ‍ॅड.नाझेर काझी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली..
       कोल्हापूर येथे महापुरामुळे हाहाकार उडाला आहे. तेथील नागरिक मोठ्या संकटात आहेत. दरम्यान, बोट उलटून काही नागरिकांचा मृत्यू झाला. या मृत व्यक्तींना जिजामाता यांच्या राजवाड्यासमोर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 'नव्या स्वराज्याचा नवा लढा' असा नारा देत दि.६ आॅगस्टपासून किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून दोन टप्प्यांमध्ये ही शिवस्वराज्य यात्रा राज्यातील ५५ विधानसभा मतदारसंघात मार्गक्रमण करीत आहे. या यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा दि.१० आॅगस्ट रोजी जिजाऊ जन्मस्थान सिंदखेड राजा येथे समारोप होणार होता. या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत ही यात्रा रद्द करण्यात आली.. पत्रपरिषदेला तालुकाध्यक्ष शिवाजी राजे जाधव, शहराध्यक्ष राजेंद्र अंभोरे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जगनराव ठाकरे, विद्यार्थी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप मेहेत्रे उपस्थित होते..
   




   

   
     

No comments:

Post a Comment