आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी घेतली कृषीमंत्री यांची भेट
देऊळगाव राजा : प्रतिनिधी
खरीप हंगाम २०१९ साठीच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा काढण्यासाठी पीक विमा पोर्टल डाऊन असल्यामुळे अडचणी येत आहेत. पिक विमा योजनेचा लाभ वंचित लाखो शेतकऱ्यांना घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख १५ दिवसांनी वाढवून द्यावी असी आग्रही मागणी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी कृषिमंत्री डॉ अनिल बोडे यांची दि. २३ जुलै रोजी भेट घेऊन केली आहे. यावेळी महसूल मंत्री ना चंद्रकांत दादा पाटील, सहकार मंत्री ना सुभाष देशमुख, व परिवहन मंत्री ना दिवाकर रावते उपस्थित होते.
परिसरात गेल्या अनेक दिवसापासून ऑनलाईन पीकविमा भरण्यासाठी पोर्टल डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा काढताना अत्यंत अडचणी येत आहेत. मागील काही दिवसांपासून सात बारा निघत नव्हत्या त्यामुळे ही सर्व्हर चालू असून सुद्धा पीक विमा भरता येत नव्हता.सध्या परिसरातील लाखो शेतकरी आपल्या पिकाचा विमा काढण्याचे राहिले आहेत.पहिले सात बारा आणी आता सर्व्हर डाऊन यामुळे शेतकरी CAC आणि सेतू सुविधा भोवती चकरा मारत आहेत. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना २४ जुलै तर कर्जदार शेतकऱ्यांना ३१ जुलै शेवटचं तारीख आहे. तारीख जवळ आल्यामुळे व पोर्टल डाऊन असल्यामुळे आपल्या पिकाचा विमा काढता येते की नाही याची काळजी शेतकऱ्यांना वाटत आहे. परिसरातील मागील हजारो शेतकऱ्यांनी आपल्या पीकाचा विमा काढला होता.यावर्षी अनेक शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा काढला आहे.मागील वर्षाच्या तुलनेत ही टक्केवारी कमीआहे.त्यामुळे परिसरातील लाखो शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित राहतील, शासनाने या सर्व बाबी लक्षात घेऊन पीक विमा योजनेस १५ दिवसाची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी केली आहे.


No comments:
Post a Comment