देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
राज्यासह जिल्ह्यातील काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्रात तर अनेक भागातील धरणे ओव्हर फ्लो झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. याउलट तालुक्यात अजुनही दमदार पाऊस न पडल्याने नदी नाल्यांसह लघु प्रकल्प कोरडे ठाक पडले आहे. तालुक्यासाठी महत्वाचा असलेला संत चोखा सागर खडकपूर्णा प्रकल्प अजुनही तहानलेलाच आहे. सध्या स्थितीत या प्रकल्पात फक्त बावीस टक्के जलसाठा उपलब्ध आहे. निम्मा पावसाळा संपत आला असतांना देखील या प्रकल्पाच्या पाणी पातळी वाढ न झाल्याने या भागातील नागरिक चिंतेत पडले आहे.
मराठवाड्याला लागुन असलेल्या देऊळगावराजा तालुक्याला नेहमीच दुष्काळाची झळ सोसावी लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. मागील दोन ते तीन वषार्पासून तालुक्यात पावसाचे पर्जन्यमान कमी झाल्याने तालुक्यासाठी महत्वाचा असलेला संत चोखा सागर प्रकल्पाच्या जल साठ्यात वाढ झाली नाही. तर दुसरीकडे तालुक्यातील लघु प्रकल्प येन हिवाळ्यातच कोरडे ठाक पडले होते. संत चोखा सागर खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाण्यावर देऊळगावराजा, सिंदखेडराजा यासह अन्य शहरांची व गावाची पिण्याच्या पाण्याची मदार आहे. जलसाठ्यात वाढ झाली नाही तर तालुक्याला पुन्हा कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागेल एवढे मात्र खरे.
अशी आहे तालुक्यातील प्रकल्पांची स्थिती
अंढेरा निरंक , मेंडगाव निरंक , पिंपळगाव चिलमखाँ निरंक , शिवनी आरमाळ निरंक



No comments:
Post a Comment