Sunday, August 11, 2019

विदर्भातील शुटिंग बॉल सघांनी सहभाग नोंदवा : अध्यक्ष डॉ.शेळके



३८ वी विदर्भस्तरीय शुटिंग बॉल १७ वायोगटातील मुले व मुली निवड चाचणीचे आयोजन 
 देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
           शुटिंग बॉल फेडरेश्न आॅफ इंडिया न्यू दिल्ली (भारत सरकार) यांचे वतीने आयोजित ३८ वी राष्ट्रीय सब ज्युनियर शुटिंग बॉल २०१९/२० गाजीयाबाद येथे आयोजित करण्यात आली त्यासाठी विदर्भाकडून खेळणाºया संघाची निवड प्रक्रिया दि.१५ आॅगस्ट रोजी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कुलच्या भव्य प्रांगणात सकाळी ९ वाजता विदर्भ शुटिंग बॉल असोशिएशन व बालाजी क्रिडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. तरी जिल्हयातील शुटिंग बॉल संघाने या निवड चाचणीमध्ये सहभाग नोंदवा असे आवाहन विदर्भ शुटिंग बॉल असोशिएश्न चे अध्यक्ष डॉ.रामप्रसाद शेळके यांनी केला आहे.
            

        मुले खेळातून गणित, भाषा, भूगोल, सामान्यविज्ञान, इतिहासासारखे शालेय विषय तर शिकू शकतातच, त्याबरोबरच त्यांना अभ्यासक्रमाबाहेरच्या उपयुक्त गोष्टीसुद्धा आपण शिकवू  शकतो. खेळताना मुलांना गंमत येते हे खरे, पण उत्तम खेळ त्यांच्या मनावर पकड घेऊ शकतात आणि ते खेळता खेळता बरेच काही शिकवूनही जातात. या दोन्ही गोष्टींचा वापर करून आपण खेळातून अधिक काही साध्य करू शकतो का? हेतुपूर्ण खेळांच्या अभिकल्पेनेचे मूळ यातच आहे. यासाठी  विदर्भ शुटिंग बॉल असोशिएश्न चे अध्यक्ष डॉ.रामप्रसाद शेळके यांनी मुला व मुली मध्ये शुटिंग बॉल खेळात रूची वाढविण्यासाठी देऊळगावराजा शहरात विदर्भसतरीय शुटिंग बॉल त्यासाठी विदर्भाकडून खेळणाºया संघाची निवड प्रक्रिया दि.१५ आॅगस्ट रोजी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कुलच्या भव्य प्रांगणात आयोजित केली आहे. गाजीयाबाद येथे होणाºया स्पर्धेत भाग घेणाºया १७ वायोगटातील खेळांडुना अतिरिक्त गुणांचा लाभ व नोकरी मध्ये होणारा लाभ मिळू शकतो शालेय शिक्षणामध्ये असणाºया फायद्या बरोबरच शारिरीक क्षमतही वाढते तसेच आपल्या शरिरीला व्ययाम मिळतो या सर्व फायद्े पाहून निवड चाचणी मध्ये विदर्भातील सर्व संबंधित शुटिंग बॉल संघटनांनी सुचित करून १५ आॅगस्ट रोजी विदर्भाचे सर्व जिल्ह्याचे संघानी सहभाग नोंदवा असे आवाहन विदर्भ शुटिंग बॉल असोशिएश्न चे अध्यक्ष डॉ.रामप्रसाद शेळके व सचिव शकिल काझी यांनी केले आहे.  



     
 




 

 
     

No comments:

Post a Comment