किर्तीकुमार अंबुसकर यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
देऊळगावराजा : (प्रतिनिधी) किर्तीकुमार अंबुसकर यांना पुत्ररत्न प्राप्त झाल्याने शुभेच्छा देणाºया नातेवाईक व मित्रांना रोपे भेट देवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. प्रदूषण वाढीमुळे निसगार्चा होत चाललेला ºहास रोखण्यासाठी हा संदेश देण्यात आला आहे.
वाढदिवस असो की, घरात सण उत्सव असो तर गल्ली बोळात शुभेच्छा देणारे बॅनर पोस्टर झळकतात. आणि काही मंडळी तर चौका चौकात केके कापून वाढदिवस साजरा करतात तर काही आपल्या मुला व मुलीच्या वाढदिवसात हजारो रुपये खर्च करुन साजरे करतात परंतु दि.२४ जुलै रोजी देऊळगावराजा शहरातील स्वमी विवेकानंद शाळेत प्रयोग शाळा परिचर पदावर कार्यरत असलेले किर्ती अंबुसकर यांना पुत्ररत्न प्राप्त झाले त्यांनी वायफळ खर्च टाळून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देवून त्याला नवजात बालकाप्रमाने सांगोपन करण्यासाठी आवाहन केले. शहरातील नातेवाईक, मित्रमंडळी यांना गोड पदार्थाच्या ऐवजी एक रोप देण्याचे ठरविले. एक घर - एक रोप या संकल्पनेतून प्रत्येकाला एक रोप देऊन रोपे संगोपन रुपी कार्य माज्या मुलाला आशीर्वाद म्हणून लाभतील या आशयाचे संदेश पत्र देण्यात आले. अशी एकूण १५० रोपांचे आम्ही शहरात वाटप केले. यात आंबा, करंजी, कडुलिंब, सीताफळ, चिकू अशा प्रकारचे रोपांचा समावेश होता.
झाडे लावा झाडे जगवा
पुष्पगुच्छ देवून निसगार्ची हानी करून साजरा करण्यापेक्षा, निसर्गरक्षणाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय वायु शुध्दीकरणात असणारी महत्वाची भुमीका लक्षात घेवून रोपांचे वाटप करून त्याचे सांगोपन करण्याची गरज आहे. किर्तीकुमार अंबुसकर यांनी हा उपक्रम राबवून नागरिकांना एक अनोखा संदेश दिला तयांचे अभिनंदन.
रुपम वाडेकर, वनरक्षक देऊळगावरजा



No comments:
Post a Comment