Friday, August 9, 2019

अण्णा भाऊ साठे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील लोकनेते : सौ.सवडे



 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
 देऊळगावराजा : (प्रतिनिधी)                                                                                                                                                                                                                                    स्वातंत्र्योत्तर भारतातील विविध चळवळींपैकी संयुक्त महाराष्टची चळवळ ही एक मोठी लोकशाहीवादी चळवळ म्हणून आधुनिक भारताच्या इतिहासात ओळखली जाते. या काळात मनोरंजनातून लोकशिक्षण आणि जनजागृती करून संयुक्त महाराष्टच्या चळवळीत नागरिकांना जागृत करण्याचे कार्य लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केले. असे मत राष्ट्रवादी पक्षाचे न.प.गटनेत्या सौ.सुनिता सवडे यांनी केले. 
          साहित्यरत्न अण्णा भाऊ  साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. लोकशाहिर साहित्शरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्व धर्म समाज बांधवांनी उत्साहात साजरी केली. यानिमित्त पिंपळनेर, माळीपुरा, संजय नगर प्रभागतील नागरिकांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा असलेल्या भव्यरथासह शहरातून मिरवणूक काढली. पुढे बोलतांना सौ.सवडे म्हणाल्या की, शाहिरांनीही महाराष्टतील जनचळवळीला सातत्याने स्फूर्ती दिली. संयुक्त महाराष्ट चळवळीत शाहिरांच्या वाणी, लेखणीने समाजमनात क्रांतीच्या ठिणग्या पडत होत्या. म्हणूनच अण्णा भाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट चळवळीतील योगदान लक्षणीय ठरते. असे मत व्यक्त केले. सदर मिरवूकी दरम्यान सर्व धर्म समाज बांधवांनी पुढाकर घेतला.

     
 




 

 
     

No comments:

Post a Comment