पालिकेच्या व्यापारी संकुलासंदर्भात जिव्हेश्वर मंदिरात पार पडली बैठक
देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
नगर पालिकेने व्यापारी संकुलातील गाळे भाडे तत्वावर देण्यासाठी जाहिर लिलाव पध्द्तीचा अवलंब केला आहे. गाळे वाटपाची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने घेवून हा लिलाव सर्व सामान्यांसाठी तसेच नव्याने व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहणाºयांसाठी अन्याय कारक असल्याचा आरोप माजी आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आयोजित बैठकीत केला आहे. तसेच नगर पालिकेच्या मनमानी कारभार विरोधात नगरविकास मंत्री व जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन त्यांच्यासोबत गाळे वाटपाच्या विषयावर चर्चा करणार असल्याचे अश्वासन या बैठकी दरम्यान उपस्थितांना डॉ. शिंगणे यांनी दिले आहे.
स्थानिक जिव्हेश्वर मंदिरात दि.२२ आॅगस्ट रोजी सायंकाळी येथील नगर पालिकेने शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील गाळे वाटपाच्या प्रक्रिये संदर्भात काही निर्णय घेतले आहे त्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. येथील नगर परिषदेच्या आरक्षण क्रमांक ४७ या जागेवर व्यापारी संकुल बांधण्यात आले आहे. यामध्ये विंग ए. विंग बी. विंग सी. असे तीन भाग पाडण्यात आले आहे. यातील विंग 'ए' मध्ये १८ व्यापारी गाळे तर विंग 'बी' मध्ये ११ व्यापारी गाळे असे एकूण २९ गाळे ३० वर्षाच्या दिर्घ मुदतीसाठी भाडे तत्त्वावर देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, नगर पालिका गाळे वाटपाची प्रक्रिया ही 'हम करे सो कायद्या' प्रमाणे आहे. पालिकेने अवलंबलेली ही पध्दत सर्व सामान्य व्यापाºयांना परवडणारी नाही. घेतलेल्या ठरावात कोणकोणत्या बाबी आहेत ते नमुद नसल्याने हा भोंगळ कारभार असल्याचे चित्र दिसून येत आहे. येथील नगर पालिका 'क' दजार्ची असून, येथे कुठलीच व्यापार पेठ नाही. या व्यापारी संकुलातील २९ गाळे पुढील ३० वर्षाच्या करारावर देण्यात येणार आहे. दुकान गळ्यामध्ये ४ गाळे हे ८ लाख रुपये, १३ गाळे ५ लाख ५० हजार रुपये तर १२ गाळे ३ लाख रुपये अनामत रक्कम प्रमाणे आहेत. यावर बोली बोलण्यासाठी ५ पटीची अट लागू केली आहे. येथील व्यापारी गाळे हे गोरगरिबांना उपयोगात यावे यासाठी बांधण्यात आले आहेत. मात्र, या मुळ उद्देशालाच पालिका प्रशासन हरताळ फासत असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केला. या बैठकीला शहरातील व्यापारी, नागरिक, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.



बेस्ट
ReplyDelete