Tuesday, January 7, 2020

माध्यमांना अनेक आव्हानांचाही सामना करावा लागतो : संभाजी पाटील


          पोलिस प्रशासनाकडून पत्रकारांचे सत्कार 
 देऊळगावराजा : प्रतिनिधी
           ६ जानेवारी १८३२ या दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' हे वृत्तपत्र सुरू केलं. हा दिवस महाराष्ट्रात 'पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जातो. १८३२ ते २०१९ हा जवळपास पावणे दोनशे वर्षांचा काळ मराठी पत्रकारितेनं या काळात अनेक स्थित्यंतरं अनुभवली. असे प्रतिपादन ठाणेदार संभाजी पाटील यांनी केले. 
        दि.६ जानेवारी रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पोलिस प्रशासनाच्या वतीने स्थानिक स्वरूची हॉटेलवर पत्रकारांचे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन कºणयात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ठाणेदार संभाजी पाटील हे होते. प्रमुख उपस्थितीत पोलीस प्रशासणाच्या वतीने भातनाते मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षा सुषमा राऊत, पत्रकार मुशीर खान कोटकर, गजानन घुगे, सुनिल मतकर होते. याप्रसंगी सुषमा राऊत, गजानन घुगे, सुनिल मतकर, आदील पठाण, मुशीर खान कोटर यांनी मनोगत व्यक्त केले. पुढे बोलतांना पाटील म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीत राजकीय भान निर्माण करणारी, अनेक सामाजिक बदलांसाठी आग्रही राहणारी ते आताची २४ बाय ७ पत्रकारिता पेन ते काँप्युटर, खिळे जुळवण्यापासून ते डिजिटल प्रिंटिंग, मुद्रित माध्यमं, टीव्ही चॅनेल्स ते हातातल्या मोबाईलवर वेळोवेळी येणारे अपडेट्सङ्घ पत्रकारिता बदलत राहिली आहे. या बदलांशी स्वत:ला जुळवून घेताना माध्यमांना अनेक आव्हानांचाही सामना करावा लागत आहे. यावेळी तालुक्यातील पत्रकार बांधव तसेच विजय किटे, शिवा केदार, सुनील खेडेकर आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment