Thursday, January 9, 2020

महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी डॉ. रामप्रसाद शेळके


 देऊळगाव राजा : प्रतिनिधी   
        महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी डॉ. रामप्रसाद शेळके यांची निवड करण्यात आली दि.५ जानेवारी  रोजी  येथील राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये पार पडलेल्या  बैठकीत जिल्हा अध्यक्ष दामूअण्णा शिंगणे यांनी कार्यादायक्ष पदा वर डॉ.रामप्रसाद शेळके यांची निवड केली आहे.
     महाराष्ट्र राज्य वारकरी  महामंडळाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष दामूअण्णा शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी  शिंगणे यांनी बोलताना सांगितले की डॉ. रामप्रसाद शेळके यांनी कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्यामुळे एक नवीन चैतन्य वारकरी संप्रदायामध्ये आले तसेच त्यांचे वडील रंगनाथ शेळके महाराज हे देखील वैष्णव गड चे अध्यक्ष आहेत हे वारकरी संप्रदायाचे असल्यामुळे यांनी हा वारसा पुढे असाच चालू ठेवावा असे ते बोलताना म्हणाले यावेळी देऊळगाव राजा  व सिंदखेडराजा तालुक्यातील इतर नियुक्त्या करण्यात आल्या यामध्ये तालुका अध्यक्ष बंडू महाराज चेके यांनी तालुका उपाध्यक्ष पदी सुधाकर बुरकुल तर सचिव म्हणून रवी अण्णा जाधव कार्याध्यक्ष स्वप्नील शिंदे यांची निवड करण्यात आली तसेच देऊळगावराजा तालुका युवा अध्यक्ष पदी संतोष महाराज पंडित सिंदखेड राजा तालुका उपाध्यक्षपदी मोहन महाराज मानतकार सहसचिव राजेंद्र वायाळ यांची निवड करण्यात आली यावेळी यावेळी जिल्हा अध्यक्ष दामूअण्णा शिंगणे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ रामप्रसाद शेळके तालुका अध्यक्ष बंडू महाराज चेके सिंदखेडराजा तालुकाध्यक्ष राजेंद्र तळेकर तसेच वारकरी संप्रदायाचे अनेक वारकरी मंडळी कार्यक्रमात उपस्थित होते.

1 comment:

  1. लोकनेते डॉ राजेंद्र शिंगणे साहेब यांची बुलढाणा जिल्हा पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐

    ReplyDelete