Thursday, January 9, 2020

समर्थ कृषी महाविद्यालयात तंबाखूमुक्त कॉलेज या कार्यशाळेचे आयोजन



देऊळगांवराजा : प्रतिनधी
        डॉ. पंजाबराब देशमुख कृषि  विद्यापीठ अकोला संलग्न समर्थ कृषि महविद्यालय देऊळगांव राजा जि. बुलडाणा येथे पूजा पिता ब्रह्मकुमारी ईश्वर विश्व विद्यालय तर्फे तंबाखूमुक्त कॉलेज या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले .प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष देवानंद कायंदे , समर्थ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबूलाल भाई अग्रवाल सुनंदाजी दीदी , लता राजपूत, ज्योती चौधरी, बी. ही. गवई उपस्थित होते.
        या प्रसंगी महाविद्यालयाचे अध्यक्ष  देवानंद कांयदे यांनी व्यसन अशी गोष्ट आहे ज्यामुळे सारे जीवन नष्ट होते. व्यसनाधीन व्यक्ती त्याच्या परिवारासोबतच समाजावर ओझे बनू शकतो असे उपस्थित विद्यार्थ्यांना पटवून दिले. डॉ. बाबुलाल भाई अग्रवाल यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बोलताना कॉलेज जीवनात विद्यार्थी हा व्यसनाकडे कशा प्रकारे आकर्षित होऊन आपल्या मित्रांसोबत सुरुवात करतो व त्यामुळे त्याच्या भविष्यावर कशाप्रकारे व्यसनामुळे परिणाम होतो याचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे असे उपस्थितांना सांगितले. समर्थ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बोलताना सांगितले की मनावर जर ताबा असेल तर आपण कोणत्याही व्यसनातून कशा प्रकारे बाहेर पडू शकतो यावर माहिती दिली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन , व आभार प्रदर्शन देवानंद डोईफोडे यांनी केले. प्रसंगी रा. स. यो. अधिकारी प्रा.राजेश भोयर. प्रा.अरविंद देशमाने , प्रा.सचिन सोळंकी, प्रा. किरण ठाकरे , प्रा. विलास चव्हाण, प्रा. शीतल ढाकणे, प्रा.श्वेता धांडे , सुवर्ण उमाळे,अर्चना जत्ती कर्मचारी  तसेच रासयो स्ययंसेवक मोठया संख्यने उपस्थित होते.

1 comment:

  1. लोकनेते डॉ राजेंद्र शिंगणे साहेब यांची बुलढाणा जिल्हा पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐

    ReplyDelete