व्यसनमुक्त, निरागस, निरामय, एकाग्र, शांत, शिस्तप्रिय, आरोग्यसंपन्न व जीवनकौशल्य युक्त जीवन किती महत्त्वाचे आहे. अशा प्रकारच्या सुजान आणि आदर्श जीवनासाठी अनुरूप विचार पेरणी गरजेचे असते. त्याला सकारात्मक राहून सदैव खतपाणी घातल्यास निश्चितच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडणे शक्य असते व विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा समतोल आणि सर्वांगीण विकास करणे व त्यातूनच विद्यार्थ्यांना सुजान, आदर्श, आत्मनिर्भर व स्वावलंबी नागरिक करण्याच्या उदात्त हेतूने देऊळगावराजा हायस्कूल मध्ये व्यसनमुक्ती, योग, आरोग्य व जीवनकौशल्य विकास कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.
दि.९ जानेवारी रोजी देऊळगावराजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आदरणीय राजपूत मॅडम यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर अग्रवाल (जालना) यांनी विद्यार्थ्यांना एकाग्रता, अभ्यास, यश, शांती, आरोग्य, व्यसनमुक्त जीवन, शिस्त, स्वावलंबन इत्यादींबाबत मौलिक मार्गदर्शन केले. तर योगाचार्य ब्रह्मकुमार राजेंद्रभाई खरात यांनी व्यसनमुक्तीवर चौफेर बोलत व्यसनमुक्ती काव्य सादर करून विद्यार्थ्यांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी.बी. राजपूत हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ब्रह्मकुमारी सुनंदा दीदी, शकुंतला दीदी, बी. व्ही. गवई, पर्यवेक्षक डी. ए. खांडेभराड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस. व्ही.मुळे , सूर्यकांत कुलकर्णी, मयुर झिने, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, शाळेचा सांस्कृतिक विभाग, रॅपिड ऍक्शन फोर्स पथक आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक विभागाचे प्रमुख वनश्री. जनाबापू मेहेत्रे यांनी केले.



लोकनेते डॉ राजेंद्र शिंगणे साहेब यांची बुलढाणा जिल्हा पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐
ReplyDelete