देऊळगावराजा : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील पोंभुर्ले या गावी जन्मलेल्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी लोकशिक्षण व ज्ञानप्रसारासाठी मराठी भाषेमध्ये वृत्तपत्र सुरू करून मराठी वृत्तपत्र व्यवसायाचा पाया घातला. त्यांनी सुरू केलेली गौरवशाली परंपरा वृद्धिंगत करण्याचे कार्य आज सर्वच माध्यमे जबाबदारीने करीत आहेत. त्या अनुषंगाने सर्व पत्रकारांनी आपली लेखणीतुन असेच कार्य करीत राहो तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारासारखे बनाअसे परखड मत शिवसेना उपजिल्हा प्रमुख दीपक बोरकर यांनी व्यक्त केले. तसेच सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
दि.६ जानेवारी रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्व प्रथम सकाळी ११ वाजता स्थानिक बाळशास्त्री जांभेकर वाचनालय व मातृतीर्थ सभागृह येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षा सुषमा राऊत म्हणाल्या की, सामाजिक-राष्ट्रीय विकासात लोकहिताची भूमिका घेऊन प्रसंगी सरकारला जबाबदारीची जाणीवही करून देण्यात माध्यमे पुढाकार घेतात. आणि म्हणूनच पत्रकारांनी अधिक विश्वासार्हता जपत तालुक्तील गोरगरीब सामान्य जनतेच्या भल्यासाठी भरीव योगदान द्यावे. पत्रकारांना सध्या विविध आघाड्यांवर लढावे लागत असून त्यांच्यासमोर अनेक आव्हाने देखील आहेत. त्यांच्या विविध प्रश्नांवर सरकार नेहमीच सकारात्मक भूमिका घेईल अशी भूमिका मांडली या वेळी बाबासाहेब साळवे यांनी आपल्या मनोगतता म्हटले की, येणाºया काळात पत्रकारांना शासना कडून हल्ला कायदा पास झालेला आहे आणि सर्व प्रथम खामगाव येथे असा गुन्हा नोंदविला आहे. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रणजित खिल्लारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रशांत पंडित यांनी व्यक्त केले. या प्रसंगी सुषमा राऊत, प्रकाश साकला, प्रशांत पंडित, रणजित खिल्लारे, अशरफ पटेल, रमेश चव्हाण, जया जैन, पूजा कायंदे, पंढरीनाथ गीते, बाबासाहेब साळवे, ओम पºहाड, शब्बीर खान, आल्हा नवाज, प्रकाश बस्सी, दयालसिंग बावरे, रवी जाधव, वसंता माळोदे, विलास जाधव, अख्तर खान, अंबादास बुरकुल, वैजीनाथ खंदारे, जुनेद कुरेशी, गजानन कायंदे, गजानन चोपडे आदी पत्रकार उपस्थित होते.


No comments:
Post a Comment