उपाध्यक्षपदी ओमप्रकाश पऱ्हाड, सचिवपदी बाबासाहेब साळवे यांची अविरोध निवड
देऊळगावराजा : प्रतिनिधी
आर्चाय बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या महात्वपूर्ण कार्यक्रमात मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाची नविन कार्याकारणी सुषमा राऊत यांच्या अध्यक्षतेखाली घोषीत करण्यात आली. मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अशरफ पटेल यांची अविरोध निवड करण्यात आली.
या बैठकीच्या सुरुवातीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. दि.२२ जुन २०१५ रोजी मातृतीर्थ पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली होती. सतत ५ वर्षापासून सुषमा राऊत यांनी अध्यक्षपद भूषविले त्यांनी दि.६ जुन रोजी आपला अध्यक्षपदाचा राजिनामा देवून नविन कार्यकारणी घोषीत करण्याचे आदेश दिले. या बैठकीत मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अशरफ पटेल, उपाध्यक्षपदी ओमप्रकाश पऱ्हाड, सचिव बाबासाहेब साळवे, सहसचिव पदी गजानन चोपडे, कोषाध्यक्ष सौ.जया सन्मती जैन, तालुका प्रसिधी प्रमुख पदी रवि जाधव यांची अविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी या प्रसंगी सुषमा राऊत, प्रकाश साकला, प्रशांत पंडित, रणजित खिल्लारे, रमेश चव्हाण, पूजा कायंदे, पंढरीनाथ गीते, शब्बीर खान, आल्हा नवाज, प्रकाश बस्सी, दयालसिंग बावरे, वसंता माळोदे, विलास जाधव, अख्तर खान, अंबादास बुरकुल, वैजीनाथ खंदारे, जुनेद कुरेशी, गजानन कायंदे, आदी पत्रकार उपस्थित होते.




No comments:
Post a Comment