स्थानिक श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने “Renewable Energy Sources & Applied Physics” या विषयावर राज्यस्तरीय पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने “Bio-Sciences For Environmental Sustainability” या विषयावर पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रभरातील विविध महाविद्यालयातील १५१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत कै.पी गवळी महाविद्यालयाच्या कु.प्रगती बेलोकर या विद्यार्थींनीने प्रथम क्रमांक पटकावला. कु.शुभांगी राठोड या श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीने द्वितीय व प्रतीक काळे या श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला येथील विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक पटकवला. परीक्षक म्हणून डॉ.प्रवीण कोकणे व डॉ नंदकुमार ठाकरे उपस्थित होते.
सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत विविध महाविद्यालयातील ९८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत कु.निकिता रेवलानी व कु.तेजस्विनी शर्मा या वाशिम येथील आर.ए महाविद्यालयतील विद्यार्थिनीनी संयुक्तरीत्या प्रथम क्रमांक पटकवला. द्वितीय क्रमांक जिजामाता महाविद्यालय, बुलडाणाच्या कु.वैष्णवी धिरबसी व रवींद्र बुंदे या विद्यार्थिनीनी संयुक्तरीत्या मिळवला. कु.साक्षी वाघ या श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या पोस्टरला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. नूतन महाविद्यालयच्या कु निता टेके व लिंबाजी मुसळे ह्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले. परीक्षक म्हणून डॉ.नितीन कस्तुरे, प्रा.पी.एस.सदार, प्रा.एस.एन. मेंढे यांनी जबाबदारी पार पाडली.
पारितोषिक वितरण
समारोहामध्ये उपस्थित मान्यवर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गजानन जाधव यांनी मार्गदर्शन केले. उपरोक्त स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवणा-या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ हजार ५०० रु, १ हजार रु, ७०० रु रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.पी.बी.पवार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.अमोल जाधव यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा.रवींद्र गणबास यांनी व्यक्त केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा.पी.बी.पवार आणि प्रा.गोविंद ढगे व भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा.अरविंद कानवटे यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.


👏👏👏👏👏👏
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteयस
ReplyDelete