देऊळगाव राजा : प्रतिनिधी
शेतकऱ्यांचे विविध मागण्यासाठी तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात महिलांवर वाढलेल्या अत्याचार विरुद्ध दि.२५ फेब्रुवारी रोजी भाजपाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
महाविद्यास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना २५ हजार हेक्टर व फळबागांसाठी ५० हजार रुपये मदत सरसकट कर्जमाफी सातबारा कोरा, अशा घोषणा केल्या होत्या, मात्र सत्तेवर बसताच त्या घोषणांचा महा विकास आघाडीला विसर पडला आहे. त्याच प्रमाणे राज्यामध्ये गेल्या महिन्याभरात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून भरदिवसा महिलांवर पेट्रोल टाकून जाळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महिला सुद्धा राज्यांमध्ये सुरक्षित नाहीत अशा या शासनाला जाब विचारण्यासाठी भारतीय जनता पार्टी धरणे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी भाजपाचे पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारचा खरपूस समाचार घेत शेतकऱ्यां प्रति उदासीन असलेल्या सरकारचा निषेध नोंदविला. या मागणीचे निवेदन तहसीलदार यांच्या कडे देण्यात आले. या निवेदनावर नगराद्यक्षा सौ.सुनीता शिंदे, भाजपा नेते डॉ.रामदास शिंदे, भाजपा नेते डॉ.गणेश मांटे, भाजपा युवा नेते डॉ.सुनील कायंदे, प्रवीण धनांवत, राजेंद्र टाकळकर, विठोबा मुंडे, एकनाथ काकड, सौ.शारदा जयभाये, निशिकांत भावसार, राजेश भुतडा, प्रवीण बन्सीले, यादवराव भालेराव, पांडुरंग गिराम, गाबाजी कुटे, संजय मुंडे, सुरेश नागरे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या साह्य आहे.


No comments:
Post a Comment