नेहरू युवा केंद्राच्या वतीने युवा सांसद कार्यक्रम संपन्न...
देऊळगाव राजा। : प्रतिनिधी
परिस्थिती माणसाला घडवत ही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवत नाही, आपण जर आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ झालात तर यशाची शिखरे गाठता येतात असे प्रतिपादन तालुका दंडाधिकारी डॉ.सारिका भगत यांनी केले.
नेहरू युवा केंद्राच्या वतीने आयोजित 'युवा सांसद' या कार्यक्रमाच्या निमित्ताने सारिका भगत बोलत होत्या. यानिमित्त मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेच सामूहिक पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पुढे बोलताना तहसीलदार डॉ. सारिका भगत म्हणाल्या की, मी एक सामान्य कुटुंबातील मुलगी होते परन्तु माझे स्वप्न होते आपल्याला यु पी एस सी , एम पी एस सी करून अधिकारी व्हायचंच आहे , आधी मी मनात ध्येय निश्चित केल आणि माझ्या ध्येयावर ठाम राहून आज तुमच्या समोर तालुका दंडाधिकारी म्हणून बोलत आहे. त्यामुळे परिस्तिथी कशी ही असो त्या परिस्थितीत वर मात करून आपण ध्येयप्राप्ती कडे आत्मविश्वासाने वाटचाल करत राहावी. या कार्यक्रमाला प्रमुख पहुणे म्हणून उपस्थित असलेले संपादक आदील पठाण आपल्या मनोगतात म्हणाले की, युवा नेतृत्व म्हणून जर समोर यायचं असेल स्वतः ला निस्वार्थ पणे समाजसेवा करणारे व्यक्तीमत्व बना, आणि यशाची सोपी आणि सरळ व्याख्या आहे ती म्हणजे 'मी थांबलो नाही'त्यामुळे आयुष्यात प्रसंग कितीही वाईट येऊ द्या त्यांना मागे टाकत हिमतिने पुढे चालत राहा यश तुमचेच आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जाधव मॅडम यांनी स्वीकारले, या निमीत्त सातपुते सर, राजपूत सर, पवार सर, काकडे सर, नेहरू युवा केंद्र तालुका समनवयक अमान शेख, आकाश सळोक ता.समनवयक व समर्थ कृषी महाविद्यालयातिल सर्व युवक, युवती उपस्थित होतेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम आघाव यांनी केले तर आभार वैष्णवी दाभाडकर यांनी मानले.



No comments:
Post a Comment