Saturday, March 28, 2020

देऊळगावराजात रक्तदान शिबिर यशस्वी


जवळपास ८३ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले 
 देऊळगावराजा : (अशरफ पटेल)
          महाराष्ट्र राज्य सरकारच्या आवाहनानंतर पुढील काळात राज्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाय योजनेसोबतच गरजू रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासू शकते. या आवाहनास प्रतिसाद देत देऊळगावराजा तालुका आरोग्य विभागाच्या वतीने व शहरातील काही समाजबांधवांनी एकत्रित येऊन मानवधर्म आणि समाज सेवेचे व्रत हाती घेऊन शनिवारी दि. २८ मार्च रोजी सकाळी नविन नगर पालिका इमारतीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ८३ रक्तदात्यांनी केले रक्तदान.
        यावेळी कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाय योजनेसोबतच आवश्यक त्या उपाय योजना करण्यात येऊन शहरातील युवा वर्ग आणि नागरिकांनी तसेच शहरातील अनेक गणमान्य नागरिकांसह युवा वगार्नी या रक्तदान शिबिरात भाग घेऊन जवळपास ८३ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. यावेळी या रक्तदान शिबिरास देऊळगावराजा शहरातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आले. राज्यातील कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजनेसोबतच गरजू रुग्णांना रक्ताची आवश्यकता दूर करण्यासाठी आजच्या रक्तदान शिबिरातून काही हातभार निश्चित मिळेल. या प्रसंगी वैधकीय अधिकारी आसमा शाहीन सह ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर आणि नर्स उपस्थित होते.

1 comment:

  1. आज रक्तदान करून देशासाठी काहीतरी योगदान दिल्याचा आनंद उपभोगता आला...
    धन्यवाद......

    ReplyDelete